दिनांक .31/05/2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार मा. वरीष्ठाचे आदेशाने पो स्टे परिसरात वाँश आउट मोहीम राबविली
हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा
मौजा चिंचोली वना नदीचे काठावर, चंद्रशेखर भोसले हा झाडाझूडूपामध्ये अवैद्यरित्या गावठी मोहा रसायान सडवा गाळीत असतांना पसार झाल्याने मोक्यावर 12 लहान प्लाँस्टीक ड्रममध्ये प्रती लिटर 100 प्रमाने 1200 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा प्रती लिटर 80 रू प्रमाने 96,000 रू 3) 12 लहान प्लाँस्टीक ड्रम प्रती ड्रम 300/- रू प्रमाणे 3,600/- रू असा एकुण जुमला किमत 99,600 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच नांदगांव ते हिंगणघाट कडे रामेश्वर घरत नावाचा इसम हा गावठी मोहा दारूची वाहतूक करतांना मिळून आल्याने जप्ती पंचनामा कार्यावाही प्रमाने जुने वापरते सुझूकी कंपीनीची ग्रे रंगाची अँसेस मोपेड वाहन क्रमांक MH 32 AN 5288 असून किं. 70,000 रू सदर वाहनाचे डिक्कीमध्ये पंचासमक्ष पाहणी केली असता प्लाँस्टीक पन्नीमध्ये 90 मिलीच्या राँकेट देशी संत्रा कंपनाच्या 100 शिश्या प्रती शिशी 120 रू प्रमाने 12,000 रू चा असा जु.किं. 82,000 रू चा माल जप्त करण्यात आला. तसेच नाईट पेट्रोलिंग दरम्यान जयंत कळंबे नावाचा देशी दारूची वाहतूक करतांना पसार झाल्याने जूने वापरते टीव्हीएस कंपनीची ज्युपीटर पाँढ-या रंगाची मोपेड वाहन जिचा नोंदणी क्र. MH 34 CL 6031 किं. 60,000 रू व टँगो पंच कंपनीचे 90 मिलीच्या देशी दारूने भरलेल्या सिलबंद 100 शिश्या प्रती शिशी 120 रू प्रमाने 12,000 रू व भिंगरी संत्रा नं. 1 कंपनीच्या 90 मिलीच्या देशी दारूने भरलेल्या सिलबंद 100 शिश्या प्रती शिशी 120 रू प्रमाने 12,000 रू असा जु.किं. 84,000 रू चा माल अशा तीनही कारवाई दरम्यान एकूण जु.किं. 2,65,600 रू चा माल जप्त करून सदर तीन आरोपीतांविरूध्द दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद केला. ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक साहेब सा. मा.पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे, पो.शि. रोहीत साठे, पोशी मंगेश वाघमारे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे. मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

