पावसाळी अधिवेशन २४/६/२०२६ ला विधानसभेत राज्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. हिंगणघाट मतदार संघाचे कार्यसम्राट मा ना श्री.समीर कुणावार

पावसाळी अधिवेशन २४/६/२०२६ ला विधानसभेत राज्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. हिंगणघाट मतदार संघाचे कार्यसम्राट मा ना श्री.समीर कुणावार 

मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 

प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना तसेच विविध घरकुल योजनांअंतर्गत मंजूर झालेल्या लाखो लाभार्थ्यांना घरकुलासाठी निधी वितरणात होत असलेल्या विलंबाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. अनेक लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे सुरू केली असून काहींनी कर्ज काढून किंवा तात्पुरत्या निवाऱ्यात राहून बांधकाम पूर्णत्वाकडे नेले आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून निधी न मिळाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तसेच नवीन SLSPS प्रणालीमधील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहिले असून निधी वितरण थांबले असल्याचा मुद्दाही मांडला.

यावर संबंधित मंत्री महोदयांनी सभागृहात उत्तर देताना घरकुल लाभार्थ्यांच्या निधीबाबत शासन सकारात्मक असून लवकरच प्रलंबित निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल तसेच प्रणालीतील त्रुटी दूर करण्यात आल्याचे आश्वासन दिले.

सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी व घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही कायम राहील.
Previous Post Next Post