॥ जामन्या आरोग्य उपकेंद्राची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
महाराष्ट्र राज्य संपादक यासीन तडवी यावल
दिनांक: ०४ जून, २०२६
स्थळ: जामन्या, ता. यावल
ग्रामीण भागातील नागरिकांना चोवीस तास आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. जिल्हाधिकारी, जळगाव यांनी जामन्या येथील आरोग्य उपकेंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
📍 प्रत्यक्ष पाहणी तपशिल:
• मूलभूत सुविधा: उपकेंद्रात स्वच्छता आणि नियमित वीजपुरवठा विषयक सुविधा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले
• कर्मचारी उपलब्धता: वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानिक पातळीवरील वास्तव्य नियमित असावे यासंदर्भात संबंधित यंत्रणेस निर्देश देण्यात आले.
• दंडात्मक कारवाई: सर्व कर्मचाऱ्यांना गावातच वास्तव्यास राहणे बंधनकारक करण्यात आले असून, शासकीय कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर तात्काळ कडक शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल असे सुचित करण्यात आले.

