"मुस्लिम धार्मिक गुरु ला, शिवीगाळ करून घोषणा देण्यास भाग पाडल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल, दोघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल"

"मौलानाला मारहाण, शिवीगाळ करून घोषणा देण्यास भाग पाडल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल, दोघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल"

महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक (रावेर / शेख शरीफ)

जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी येथे एका नुराणी मस्जिदीच्या मौलानाला अडवून मारहाण, शिवीगाळ व धार्मिक घोषणा देण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मौलाना सय्यद हकमअली हाशम अली हे काही दिवसांपूर्वी तामसवाडी येथील नुराणी मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी आले होते. एफआयआरमधील मजकुरानुसार, 10 जून रोजी सकाळी गावातील बसस्थानक परिसरात त्यांना एका व्यक्तीने अडवून त्यांच्या गावात येण्याबाबत जाब विचारत अश्लील शिवीगाळ केली होती.
त्यानंतर 11 जून रोजी सकाळी पुन्हा हायस्कूल परिसरात त्यांना अडवून शर्टाची कॉलर पकडण्यात आली, कानशिलात मारण्यात आली तसेच मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग करत "जय श्रीराम", "जय सीताराम" आणि "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणा देण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकारामुळे स्वतःच्या तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.
या प्रकरणी हेमंत मच्छींद्र पवार उर्फ नाट्या आणि समाधान भाउसाहेब धोबी (दोघेही रा. तामसवाडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 299, 196(1)(अ), 351(2), 352, 115(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची गंभीर दखल घेत पारोळा पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल निलेश साळुंखे यांच्याकडे सोपविला आहे.
Previous Post Next Post