यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमनपदी नारायण चौधरी तर व्हाईस चेअरमनपदी प्रविण वारके यांची निवड.

यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमनपदी नारायण चौधरी तर व्हाईस चेअरमनपदी प्रविण वारके यांची निवड.

महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल 

यावल दि.१२ (सुरेश पाटील )
येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी सहनिबंधक अचूत भागानगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदासाठी भालोद येथील नारायण चौधरी तर व्हाईस चेअरमनपदासाठी प्रविण वारके या दोघा संचालकांचे प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने चेअरमनपदी नारायण शशीकांत चौधरी ( भालोद ) यांची निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी प्रविण भास्कर वारके ( न्हावी ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 

खरेदी विक्री संघाच्या बैठकीत नुतन चेअरमन नारायणबापु चौधरी व भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिरालाल चौधरी यांनी मार्गदर्शनपर मनोगत केले. संचालक मंडळाच्या बैठकीत संघाचे मावळते व्हाईस चेअरमन अतुल भागवत भालेराव,संचालक नरेन्द्र विष्णु भंगाळे,उमेश फेगडे , हेमराज उर्फ बाळासाहेब फेगडे, धनंजय यशवंत फिरके,शिवसेनेचे तुषार उर्फ मुन्ना सांडूसिंग पाटील,
तेजस धनंजय पाटील,संचालीका सौ आरती शरद महाजन,सौ. नयना चंद्रशेखर चौधरी,डॉ,नरेन्द्र वामन कोल्हे,अतुल वसंतराव पाटील सर्व संचालकासह कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपुत,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपा सहकार आघाहीचे जळगाव जिल्हाध्यक्ष राकेश वसंत फेगडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हर्षल पाटील,संघाचे माजी व्हाईस चेअरमन प्रभाकर सोनवणे,सुनिल फिरके,विलास चौधरी,प्रगतीशिल शेतकरी प्रमोद नेमाडे.नितिन महाजन,उपस्थित होते या वेळी निवड झालेले चेअरमन नारायण चौधरी व व्हाईस चेअरमन प्रविण वारके यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला.

शासनाकडून थकीत २५ लाख गोडाऊन भाडे वसूल होणार..?

शासनातर्फे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान्य साठवून ठेवण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे गोडाऊन भाड्याने घेतले होते आणि आहे त्या गोदामाचे गेल्या दहा वर्षातील अंदाजे २५ लाख रुपये थकबाकी शासनाकडे म्हणजे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे थकीत आहे. नवनिर्वाचित चेअरमन नारायण बापू चौधरी हे भारतीय जनता पार्टीचे तथा आमदार अमोल दादा जावळे यांचे खास समर्थक असल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडून २५ लाखाची थकबाकी लवकरच मिळणार असल्याची अपेक्षा तालुक्यातील सहकार क्षेत्रातून होत आहे.
Previous Post Next Post