अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी,धर्माबाद ते मुंबई पद यात्रेचे बिलोली येथे स्वागत करण्यात आले.

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी,धर्माबाद ते मुंबई पद यात्रेचे बिलोली येथे स्वागत करण्यात आले.


मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :बिलोलीआरक्षण उपवर्गीकरण संदर्भात धर्माबाद ते मुंबई पदयात्रा लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून काल धर्माबाद येथून निघाले असून आज पद यात्रा बिलोली येथे दाखल झाले असून तालुक्यातील मातंग समाज मोठ्या प्रमाणात बिलोली येथे उपस्थित होता व बिलोली  शहरातील साठे नगर येथे बैठक घेण्यात आली यावेळी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ रांमचंद्र भंराडे,तर बैठकीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे , नेते व्ही जी डोईवाड, रावसाहेब दादा पवार, गणपत रेडी, जिल्हाध्यक्ष नागोराव कुडके, तालुकाध्यक्ष गंगाधर सिदलोन, यांची प्रमुख उपस्थिती होती
सुत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते मुकिदर कुडके यांनी केले, बाबूराव कुडके संचालक कृ उ बा समिती, पत्रकार गंगाधर कुडके, पत्रकार मार्तंड जेठे , संजय जेठे, प्रशांत कटारे, शेषेराव जेठे, गंगाधर जेठे,शुभम जेठे नवतरूण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष नागोराव कुडके यांनी मानले,
यानंतर साठे नगर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रॅली काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा वंदन करण्यात आले
आणि ६ जूलै रोजी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित  राहण्याचे आश्वासन मातंग समाजाकडून लोकस्वराज्य आंदोलन संघटना अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र ब्रांडे सरांना देण्यात आले.
Previous Post Next Post