वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी; गोंधळ आंदोलनाचा इशारा.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी; गोंधळ आंदोलनाचा इशारा.

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी देगलूर 


देगलूरः येथील उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी महीन्यातुन ५ दिवस हजर न रहाता महीन्यातील सर्व दिवस हजर राहून दररोज गोर गरीब दिन दलित शेतकरी शेतमजूर यांना आरोग्य सेवा द्यावी व १०० खाटाचे रुग्णालय त्वरित कार्यान्वित व्हावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दि.१५ जुन रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गोंधळ आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पेरेवाड यांना देण्यात आले. शिवराया उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की, देगलूरचे उपजिल्हा रुग्णालय हे तेलंगणा, कर्नाटक सीमेवर असुन या परीसरात गोरगरीब दिन- दलित, शेतकरी, शेतमजूर, आदीवासी आदी गोर गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात असत्यामुळे शासनाने माजी आमदार सुभाष साबणे यांच्या कार्यकाळात १०० खाटाचे रुग्णालयाची मंजूरी मिळाली होती पण माशी कुठे शिंकली माहीती नाही ८ वषार्चा कार्यकाळ लोटला तरी १०० खाटाचे रुग्णालयात रुपांतर काय झाले नाही परत पुन्हा एकदा आ. जितेश अंतापुरकर यांनी नव्याने १०० खाटाच्या रुग्णालयाची मंजूरी मिळाली असल्याचे सांगितले आहे पण १०० खाटाचे रुग्णालयात रुपांतर कधी होईल देवच जाणे पण सध्या तरी वैद्यकीय अधिकारी उपस्थितीत राहत नसल्याने शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने गरिबांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही उपजिल्हा रुग्णालयात एकूण १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असुन सुद्धा दररोज आळीपाळीने १ एकच वैद्यकीय अधिकारी उपस्थितीत राहुन सेवा देतात बाकीचे ११ वैद्यकीय अधिकारी आप आपल्या खाजगी दवाखाने चालवून फावड्याने पैसे कमावण्यात धन्यता मानतात.
त्यामुळे गोर गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळत नाहीत खाजगी दवाखान्यात किंवा नदिडला जाऊन उपचार घ्यावे लागत असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे नियुक्त असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दररोज वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी उपस्थितीत रहावे व १०० खाटाचे रुग्णालय कागदोपत्री मंजूर केल्याचे घोडे न नाचविता त्वरित १०० खाटाचे रुग्णालय सुरू करण्यात ठाकरे पक्षाच्या वतीने यावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब दि.१५जून रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गोंधळ आंदोलन करण्यात महेश येणार असल्याचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पेरेवाड यांना देण्यात आले आहे यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पाटील, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना शहर प्रमुख भगवान जाधव, युवा सेना प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Previous Post Next Post