।। जाहीर प्रसिद्धीपत्रक ।।विषय: पत्रकार बांधवांचा अपमान करून पुन्हा माफी मागण्याच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध आणि बातम्यांवर बहिष्काराचे आवाहन.
(अकोला मुख्य जिल्हा प्रतिनिधी इमरान खान)
दिनांक: २७ जून २०२६स्थळ: महाराष्ट्र"लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांना सातत्याने अपमानजनक वागणूक द्यायची आणि नंतर केवळ औपचारिकता म्हणून माफी मागायची, हा एक अत्यंत चुकीचा प्रघात पडत चालला आहे. अशा दुटप्पी भूमिकेला आता पूर्णविराम मिळणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन ह्यूमन राइट्स महाराष्ट्र युवा अध्यक्ष इम्रान खान यांनी केले आहे.या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात इम्रान खान यांनी म्हटले आहे की, "पत्रकार हे अहोरात्र कष्ट करून समाजातील वास्तव आणि जनतेचे प्रश्न समोर आणण्याचे काम करत असतात. परंतु, काही घटकांकडून जाणीवपूर्वक पत्रकारांचा अवमान केला जातो आणि नंतर राजकीय किंवा सामाजिक दबावामुळे माफी मागितली जाते. या माफीनाम्याला काहीही अर्थ नसून, यामुळे पत्रकारांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत आहे.""या अपमानकारक वागणुकीचा तीव्र निषेध म्हणून, माझ्या मते सर्व पत्रकार बांधवांनी आणि माध्यम समूहांनी अशा प्रवृत्तींच्या कोणत्याही बातम्या किंवा कार्यक्रमांना यापुढे अजिबात प्रसिद्धी देऊ नये. हा सामूहिक बहिष्कारच अशा प्रवृत्तींना योग्य धडा शिकवू शकेल," असे आवाहनही खान यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.- ह्यूमन राइट्स महाराष्ट्र (युवा विभाग)

