अस्सल साधेपणा* ...... *कोठारी हाॅस्पिटल व फिजिओथेरपी सेंटर स्थानांतरण सोहळा*

*अस्सल साधेपणा* ......
 *कोठारी हाॅस्पिटल व फिजिओथेरपी सेंटर स्थानांतरण  सोहळा* 

(मो मकसुद बावा वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक)

         कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी, बडेजावपणा, अवडंबर न करता अगदी साधेपणाने *कोठारी हाॅस्पिटल व फिजिओथेरपी सेंटर* चा स्थानांतरण समारंभ आज दिनांक २२/०६/२०२६ रोज सोमवारला पार पडला.
 *मातृदेवो भव.....पितृदेवो भव* ह्या वेदवाक्यानुसार  आपल्या *आई सौ सरोजदेवी कोठारी व वडील अँड सुधीरबाबुजी कोठारी* यांचेहस्ते आपल्या भव्य हाॅस्पिटलचा स्थानांतरण सोहळा कुठलाही समारंभ न करता साधेपणाने पार पडला .शहरातील *नामवंत हृदयरोग तज्ज्ञ व मधुमेह तज्ज्ञ डॉ निर्मेशजी कोठारी व प्रसिद्ध भौतिकोपचारतज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉ सौ सुरभीजी कोठारी* यांचे नवीन कोठारी हाॅस्पिटल व फिजिओथेरपी सेंटर मेन रोड, नेहरु वार्ड, हिंगणघाट येथे स्थानांतरित करण्यात आले. यावेळी निवडक रुग्ण व कर्मचारी वृंद उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी पुष्पगुच्छ देत डॉ निर्मेशजी कोठारी सर व डॉ सौ सुरभीजी कोठारी मॅडम यांना शुभेच्छा दिल्या.

 मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
Previous Post Next Post