जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्योग सर्वेक्षणाचा शुभारंभ

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्योग सर्वेक्षणाचा शुभारंभ 

मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 

वर्धा, दि. 15/6/2026 जिल्ह्यात श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दोन्ही सर्वेक्षणांच्या माहितीपत्रकांचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाला वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, हिंगणघाट नगराध्यक्षा डॉ. नयना तुळकसकर, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त मुरलीनाथ वाडेकर, सहाय्यक नियोजन अधिकारी राधाकृष्ण चव्हाण तसेच मुख्याधिकारी विजय देशमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील रोजगार, बेरोजगारी, श्रम सहभाग दर तसेच असंघटित उद्योगांची स्थिती जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार असून ते मार्च 2027 पर्यंत राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी निवडलेल्या कुटुंबांनी व उद्योगांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.
Previous Post Next Post