रावेर तालुक्यातील आजंदे येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा 'शाळा प्रवेशोत्सव' सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न.
( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे )
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १५ जून २०२६ रोजी, शाळेत ज्ञानार्जनासाठी पाऊल ठेवणाऱ्या चिमुरड्यांचे स्वागत एखाद्या सणासारखे करण्यात आले.
नवागतांचे ढोल-ताशांच्या गजरात औक्षण करून स्वागतशाळेच्या पहिल्या दिवशी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शाळा परिसर आकर्षक फुगे, रंगीत पताके आणि सुंदर रांगोळ्यांनी सजवण्यात आल्या होत्या . शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प देऊन, त्याचे औक्षण करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
मोफत पाठ्यपुस्तके व वह्या वाटप'
शाळा प्रवेशोत्सव २०२६' अंतर्गत शासनाच्या योजनेनुसार, पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके,व वह्या वाटप करण्यात आले. नवीन पुस्तके आणि वह्या हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
प्रभात फेरीने दुमदुमले आजंदे गावग्रामस्थांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी गावातून विद्यार्थ्यांची 'प्रभात फेरी' काढण्यात आली. "मुले-मुली एकसमान, सर्वांना देऊ शिक्षण छान" अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले.मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शनया सोहळ्याला आजंदे गावचे स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच दत्तात्रय कोळी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितु भाऊ इंगळे , सदस्य, सचिन सोनवणे. अनिल कोळी. समाधान पाटील , तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात पालकांना आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठवण्याचे आणि जिल्हा परिषदेच्या डिजिटल व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मध्यान्ह भोजनात गोड खाऊशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा आनंद टिकून राहावा यासाठी शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना विशेष गोड पदार्थाचे जेवण देण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापक श्रीमती मनिषा प्रल्हाद पाटील,उपशिक्षक श्री किरण चिंधूजी सावळे, शिक्षण सेवक श्री. विठ्ठल बबन धुमाळ तसेच. विवरे केंद्राचे केंद्रप्रमुख दीपककुमार रमाकांत सोनार सरअंगणवाडी स्टॉप सोनल अरविंद बिरपन सौ. नलिनीबाई सोपान पाटील सौ मायाबाई रुपचंद सोनवणे श्रीमती प्रतिभा यशवंत पाटील श्रीमती सोनल मोहन सुर्यवंशी श्रीमती लतिका सेनू लोखंडे सौ. अलका अशोक सोनवणे .सर्व शिक्षक वृंदाने हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या प्रवेशोत्सवामुळे आजंदे गावात मराठी शाळेविषयी आणि शिक्षणाविषयी एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

