ऑनलाइन खत विक्री प्रणालीमुळे शेतकरी त्रस्त; आजाद समाज पार्टी (काशीराम) कडून निवासी जिल्हाधिकारी विधाते साहेबांना निवेदन

ऑनलाइन खत विक्री प्रणालीमुळे शेतकरी त्रस्त; आजाद समाज पार्टी (काशीराम) कडून निवासी जिल्हाधिकारी विधाते साहेबांना निवेदन

छत्रपती संभाजी नगर जिल्हा क्राईम उपसंपादक राजु साठे 

छत्रपती संभाजीनगर, दि. ११ जून : आजाद समाज पार्टी (काशीराम) यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी विधाते साहेब यांना ऑनलाइन खत विक्री (Framework for Fertilizer Sale) प्रणालीची सक्ती तात्पुरती शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी मा अरविंद कांबळे, जिल्हाध्यक्ष मा. विजय शिनगारे यांनी निवासी जिल्हाधिकारी विधाते साहेब यांना ऑनलाइन खत विक्री प्रणालीतील तांत्रिक अडचणी, वारंवार बंद पडणारा सर्व्हर, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आणि त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध न झाल्यास पेरणी व पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

निवेदनाद्वारे ऑनलाइन खत विक्री प्रणालीची सक्ती तात्पुरती शिथिल करून ऑफलाइन पद्धतीनेही खत विक्री करण्यास परवानगी द्यावी, तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून सर्व्हर सुरळीत सुरू ठेवावा, ग्रामीण भागातील इंटरनेट समस्येवर पर्यायी व्यवस्था करावी तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय वेळेवर खत उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

निवासी जिल्हाधिकारी विधाते साहेब यांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे सदर मागण्या तातडीने पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

यावेळी  मा. अरविंद कांबळे (प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी),  मा. शिवाजी वीर (मराठवाडा अध्यक्ष), मा विजय शिनगारे (जिल्हाध्यक्ष) मा. तातेराव ससाने (मराठवाडा कार्याध्यक्ष), मा. काशिनाथ भाडेगावकर (मराठवाडा महासचिव), मा. राहुल साबळे (जिल्हा प्रभारी), मा. जावेद शेख (शहर अध्यक्ष), मा. अनामी मोरे (युवा जिल्हाध्यक्ष), मा. साहेबराव दाभाडे (जिल्हा उपाध्यक्ष), मा. नवाब पटेल (अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पश्चिम) मा. अमोल सोनवणे (शहर उपाध्यक्ष) मा अल्ताफ शेख (शहर उपाध्यक्ष )आणि मा. भगवान ठोकळ (तालुका उपाध्यक्ष) उपस्थित होते.
Previous Post Next Post