जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेचा विजय; वंशिका पारीसेची नवोदय विद्यालयात निवड...** जवाहर नवोदय विद्यालय, सेलू-काटे (वर्धा) येथे प्रवेश निश्चित; पालक, शिक्षक व सृजन इंग्लिश स्कूलकडून अभिनंदनाचा वर्षाव

*जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेचा विजय; वंशिका पारीसेची नवोदय विद्यालयात निवड...*

* जवाहर नवोदय विद्यालय, सेलू-काटे (वर्धा) येथे प्रवेश निश्चित; पालक, शिक्षक व सृजन इंग्लिश स्कूलकडून अभिनंदनाचा वर्षाव

देवळी प्रतिनिधी:-
(रविंद्र पारीसे) 

          सृजन इंग्लिश स्कूल, देवळी येथील इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी कु. वंशिका पवन पारीसे हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जवाहर नवोदय विद्यालय, सेलू-काटे (जि. वर्धा) येथे प्रवेशासाठी निवड मिळविली आहे. तिच्या या यशामुळे शाळा, कुटुंब आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
            नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. या स्पर्धात्मक परीक्षेत वंशिकाने मेहनत, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर यश संपादन केले आहे.
        वंशिकाच्या या यशाबद्दल सृजन इंग्लिश स्कूलच्या संस्थापक श्रीमती श्रद्धा चोरे, प्राचार्य प्रिया वैद्य तसेच सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असून त्याचेच हे यशस्वी फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



*बॉक्स*
माझी मुलगी कु. वंशिका हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळवून आमच्या कुटुंबाचा अभिमान वाढविला आहे. तिच्या या यशामागे तिची मेहनत, जिद्द आणि सृजन इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. संस्थापक श्रद्धा चोरे मॅडम, प्राचार्य प्रिया वैद्य मॅडम आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक आधारामुळे हे यश शक्य झाले. वंशिकाने भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करत मोठे यश संपादन करावे, हीच अपेक्षा आहे.
----- पवन पारीसे (पालक)

वंशिकाची नवोदय विद्यालयात झालेली निवड ही शाळेसाठी गौरवास्पद बाब आहे. तिच्या मेहनतीचे हे यश असून भविष्यात ती अधिक मोठी कामगिरी करेल, असा विश्वास आहे.
---- श्रीमती श्रद्धा चोरे (संस्थापक, सृजन इंग्लिश स्कूल)

वंशिकाने सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल.
---- प्रिया वैद्य (प्राचार्य)


माझ्या पालकांचे, शिक्षकांचे आणि शाळेचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळेच मला हे यश मिळाले. भविष्यातही अधिक मेहनत घेऊन चांगले शिक्षण घेण्याचा प्रयत्न करेन.
---- कु. वंशिका पवन पारीसे
Previous Post Next Post