मोहरम ताजिया निमित्त शिवसेना परिवार युवा सेना व शहर विकास आघाडी तर्फे सरबत वितरणाचा उपक्रम*
*
महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपूर
भद्रावती दि.27:- येथे मोहरम ताजिया निमित्त शिवसेना परिवार तसेच शहर विकास आघाडीच्या वतीने नागरिक व ताजिया मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी सरबत वितरण करण्यात आले.
सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सर्वधर्म समभावाची परंपरा जपत शिवसेना परिवाराने हा सेवाभावी उपक्रम राबविला. समाजातील प्रत्येक घटकासोबत आपुलकीचे नाते निर्माण करणे हीच शिवसेनेची ओळख आहे.
*शिवसेना लोकसभा संघटक मुकेशभाऊ जीवतोडे यांचे मार्गदर्शनात* *नगराध्यक्ष प्रफुल भाऊ चटकी* व नगरसेवक युवा सेना लोकसभा समन्वयक महेश जिवतोडे शिवसेना शहर प्रमुख प्रफुल भाऊ सरवान युवासेना जिल्हा संघटक सुमित हस्तक नगरसेवक बांधकाम सभापती मंगेश भाऊ सोनुलकर नगरसेवक संतोष भाऊ कुरेकर नगरसेवक गौरव नागपुरे माजी नगरसेवक राजू भाऊ सारंगधर माजी नगरसेवक प्रमोद भाऊ गेडाम कमलेश भाऊ दातारकर साहिल वांढरे सोनू रोडे वैष्णव डावले अनोख गेडाम अमन झिंगरे अनिकेत मंगाम इत्यादी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

