छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री प्रकरणात समाधान पुर्ती वर कारवाई...ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे ग्राहकाची तक्रार

छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री प्रकरणात समाधान पुर्ती वर कारवाई

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे ग्राहकाची तक्रार


 महेश निमसटकर 
 जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर 


भद्रावती, दि.१६ : शहरातील समाधान पुर्ती सुपर बाझार वर ग्राहकाला छापील किंमतीपेक्षा जादा दराने वस्तू विक्री प्रकरणात वैध मापन शास्त्र विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली.
     प्राप्त माहितीनुसार, शहरातील समाधान पुर्ती सुपर बाझार मधुन ग्राहक अशोक शेंडे यांनी दि. २९ मे ला काही किराणा सामान विकत घेतले. त्यामध्ये एक लिटर चे ऑलीव्ह ॲक्टीव्ह ऑईल विकत घेतले. ऑईलच्या पॅकेट वर २५५ रू. छापील किमत असतांना त्यांचेकडून २७५ रू. म्हणजे २० रु. जादा घेतल्याचा प्रकार समोर आला.
     ग्राहक अशोक शेंडे यांना आपली फसवणुक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी याविषयी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे अध्यक्ष, प्रविण चिमुरकर यांचे सोबत संपर्क केला आणि लिखित तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने लगेच कारवाई करत हे प्रकरण वैध मापन शास्त्र विभाग, चंद्रपूर यांचे कडे पाठवले.
     उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग, जितेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनात वैध मापन शास्त्र विभागाचे निरिक्षक सुनिल वाडे यांनी दि. ८ जुन ला धडक कारवाई करत वैध मापन शास्त्र अधिनियम २००९ व आ. वस्तू. नियम २०११ चे (१८)२ च्या नुसार छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यामुळे समाधान पुर्ती सुपर बाझार वर प्रकरण दाखल केले.
     या कारवाई मुळे ग्राहक अशोक शेंडे यांना न्याय मिळाला असून शेंडे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती आणि वैध मापन शास्त्र विभागाचे आभार व्यक्त केले आहे.


Previous Post Next Post