वाहनधारकांनो लक्ष द्या...भुसावळ-फैजपूर रस्ता असेल बंद !

वाहनधारकांनो लक्ष द्या..भुसावळ -फैजपूर रस्ता असेल बंद ! 

जळगाव खान्देश विभागीय उपसंपादक शकील तडवी 

आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत राज्यसीमा-विटवा- भुसावळ-जामनेर-फैजपूर-मोटाळा - तामसवाडी फाटा रस्ता (रा.मा. ४८) वरील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिले आहेत. ही वाहतूक १७ जून ते १६ जुलै पर्यंत बंद राहील. याकरिता पर्यायी रस्ता म्हणून जड वाहनांसाठी फैजपूर, हंबर्डी, हिंगोना. सांगवी, चितोडा यावल निमगाव अंजाळे भुसावळ या मार्गे चालू राहील, तर हलक्या वाहनांकरिता फैजपूर, हंबर्डी, भालोद, चिखली, अंजाळे, भुसावळ असा मार्गक्रमण राहील, वाहनधारकांनी वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई पोलिस कायदा कलम ३३ १ ब नुसार दिले आहेत. याची सर्व वाहनधारकांनी कृपया नोंद घेऊन वरील मार्गाचा अवलंब करावा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलेले आहे
Previous Post Next Post