आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुवर्ण पदक विजेती डॉ.पूजा देऊळकर यांचा सत्कार सोहळा व दिव्यांगास सायकल वितरण संपन्न.सुवर्ण पदक विजेत्या डॉ.पूजा ने पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगगुरू रामदेव बाबा यांचे मानले विशेष आभार.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  सुवर्ण पदक विजेती डॉ.पूजा देऊळकर यांचा सत्कार सोहळा व दिव्यांगास सायकल वितरण संपन्न.

सुवर्ण पदक विजेत्या डॉ.पूजा ने पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगगुरू रामदेव बाबा यांचे मानले विशेष आभार.

 महेश निमसटकर 
 भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक 

भद्रावती, दि.२१ :-आज दिनांक २१ जून रोजी भद्रावती शहरात विविध ठिकाणी योग दिन मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आला.  गवराळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत योगासन दिवस साजरा करीत औषधी वनस्पती चे रोपण पार पडले. नंतर स्थानिक कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती च्या वतीने योग दिनाचे औचित्य साधत शहराची जागतिक सुवर्ण पदक विजेती योगपटु डॉ. पूजा उर्फ ज्योती देवराव देऊळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हनुमान घोटेकर , तसेच पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अब्बास अजानी यांचे योगदानातून तथा जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ संचालित कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती तर्फे दिव्यांग बालकास स्वयंचलित सायकल प्रदान करण्यात आली. 

जागतिक योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक पटकावून देशाची मान उंचावणारी डॉ. पूजा उर्फ ज्योती देवराव देऊळकर यांचा समितीतर्फे विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. जन्मताच आरोग्य विषयक गंभीर आजार, तद्वतच आर्थिक अभाव यामुळे कोणताही व्यावसायिक प्रशिक्षक नसताना सुद्धा, जिद्द, चिकाटी,आत्मविश्वास या बळावर ग्रामीण भागातील या भद्रावती च्या कन्येने पहिल्याच जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून योगासन या क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना अचंभित केले.

याप्रसंगी जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ तथा सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैषनिक, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे संचालन प्रकाश पिंपळकर, प्रस्तावना नगरसेवक राजेश बदखल, तर आभार प्रदर्शन  रमेश खातखेडे  यांनी केले.
Previous Post Next Post