नवी आबादी जिल्हा परिषद शाळेच्या भिंती लगत असलेल्या नालीवर झाकण नसल्यामुळे मुले नालीत पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही..
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
दिनांक..२५/०६/२०२६
नवी आबादी जिल्हा परिषद मराठी व उर्दू माध्यमिक शाळा आहे आणि त्या शाळेच्या भिंतीला लागूनच मोठा रोड आहे तो रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेस्ट हाऊस कडे जाते व तसेच नगरपंचायत चा सुद्धा मार्ग तोच आहे परंतु त्या मार्गावर वर्दळ जास्त असल्याकारणाने शाळेचे मुले जीव मुले जीव मुठीत धरून शाळेत येणं जाणं करते परंतु त्या नाली वर झाकण नसल्यामुळे गडबडीत जाणारा मुलगा तिथे टप्पा नाही आहे अलीकडून पायरी नाही आहे मुलांना चढायला खूप कठीण आहे तरीपण शालेय व्यवस्थापन समिती यांच्याकडे डोळे झाक करत आहेत आणि मुलांना चढण्यासाठी पायरीची व्यवस्था नाही आहे बरोबर पायऱ्या नाही आहे अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकाकडून होत आहे त्या नाली
मध्ये दुर्गंधी पसरलेली आहे पावसाळ्याचे दिवस आहेत रोग पसरण्याची भिती आहे तरीपण बीडिओ साहेबांनी याकडे लक्ष घालावं व त्या नालीवर झाकण टाकून दोन्ही बाजूचे पायऱ्या दुरुस्त करून द्यावी अशी पालकांच्या वतीने मागणी आहे त्या शाळेमध्ये पहिली दुसरी तिसरी व चौथीचे मुलं हे सगळे लहान असून त्यांना चढण्यासाठी चढण्यासाठी पायरी नसल्यामुळे त्यांचा तोल इकडे तिकडे जातो त्या नालीमध्ये मुलं पाडण्याची शक्यता दाट आहे तरी शालेय व्यवस्थापन समिती ने अधिक लक्ष घालून हे काम ताबडतोब पूर्ण करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून आहे

