अकोला पोलिसांची धडक कारवाई; दोन दुचाकी चोरांना अटक, १ लाखाचा मुद्देमाल जप्त*

*अकोला पोलिसांची धडक कारवाई; दोन दुचाकी चोरांना अटक, १ लाखाचा मुद्देमाल जप्त*

(अकोला मुख्य जिला प्रतिनिधि इमरान खान मीडिया पोलिस टाईम) 

अकोला:शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका विशेष मोहिमेअंतर्गत दोन सराईत दुचाकी चोरांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या २ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून, एकूण १,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे खदान आणि सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.गुप्त बातमीदाराच्या मदतीने कारवाईअकोला शहरात वाढणाऱ्या वाहन चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी एलसीबीचे प्रमुख पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना आदेश दिले होते. त्यानुसार एक विशेष पथक गठीत करण्यात आले. २२ जून रोजी, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अकोट फैल परिसरामध्ये सापळा रचला.हे आहेत आरोपीसंशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:१) शेख तौसीफ शेख इब्राहीम नादलीवाले (वय २२ वर्षे, रा. पाचमोरी, अकोट फैल, अकोला)२) राजीक खान रहमत खान (वय २४ वर्षे, रा. संजय नगर, अकोट फैल, अकोला)पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुलीदोन्ही संशयितांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी अकोला शहरातील खदान आणि सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीच्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. तपासादरम्यान, जप्त केलेल्या गाड्यांबाबत खदान पोलीस ठाण्यात अप.क्र. १४९/२०२६ आणि सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अप.क्र. ५०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपी व वाहने संबंधित पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.यांनी केली कारवाईसदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण, पोलीस अंमलदार शेख हसन, रवि खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेंद्र मलिये, किशोर सोनुने, भास्कर धोत्रे, स्वप्नील खेडकर, मंगेश इंगळे, अमोल दिपके, श्रीकांत पातोंड आणि चालक देवानंद खरात यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Previous Post Next Post