पंचशील ध्वजाच्या पूर्णस्थापनेसाठी लोहयात भव्य जनआक्रोश मोर्चा आंबेडकरी समाज व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा प्रशासनाला इशारा

पंचशील ध्वजाच्या पूर्णस्थापनेसाठी लोहयात भव्य जनआक्रोश मोर्चा
 
आंबेडकरी समाज व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा प्रशासनाला इशारा 


मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : नांदेड लोहा जायकवाडी प्रकल्प येथे पंचशील ध्वजाच्या पूर्ण स्थापनेसाठी लोह्यात भव्य जन आक्रोश मोर्चा,वंचित बहुजन आघाडी कडून तहसील कार्यालयावर काढण्यात आला यात पंचशील ध्वजाची पूर्णस्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी कंधार लोहा येथील  व जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने लोहा  शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अनुयायी तसेच, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पंचशील ध्वजाबाबत निर्माण झालेल्या परिस्थिती विरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी ध्वजाची तात्काळ पूर्णस्थापना करण्याची मागणी केली, मोर्चादरम्यान विविध घोषणाबाजी करण्यात आली तसेच,प्रशासनाने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडी सदस्य अविनाश भाऊ भोशीकर, व महाबोधी भन्तेजी,युवा वंचित बहुजन आघाडी सदस्य अक्षय बनसोडे,वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन, नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष राज आटकोरे, नांदेड दक्षिण जिल्हा महासचिव रवी पंडित, वंचित बहुजन आघाडीचे सर्व नगरसेवक व व तालुका कार्यकर्ते, माजी तालुकाध्यक्ष, माजी पदाधिकारी  सन्माननीय,कार्यकर्ते व आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता लवकरात, लवकर पंचशील ध्वजाचा स्थापना करण्यात यावा, असा कडक इशारा प्रशासनाला यावेळी देण्यात आला.
Previous Post Next Post