*नाजिया इलाही खान यांच्या विरोधात कारवाईची मागणी;* *रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार पश्चिम विधानसभा अध्यक्ष महेमुद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर*

*नाजिया इलाही खान यांच्या विरोधात कारवाईची मागणी;* *रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार पश्चिम विधानसभा अध्यक्ष महेमुद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर*

(अकोला मुख्य जिला प्रतिनिधि इमरान खान)

अकोला : सोशल मीडियावर इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद रसूलुल्लाह (सल्लल्लाहु अलैहि व सल्लम) तसेच उम्मुल मोमिनीन हजरत आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी व पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप करत मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, नाजिया इलाही खान यांनी सोशल मीडियावर केलेल्या कथित टिप्पण्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजामध्ये संताप व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, अशा टिप्पण्या धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्या असून विशिष्ट समुदायाच्या श्रद्धा व भावनांना ठेस पोहोचविणाऱ्या आहेत.
यासंदर्भात रामदासपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 299 तसेच इतर लागू असलेल्या कलमांनुसार गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीवर महेमुद खान पठाण, रौशन खान आर.के., अमीन खान पठाण, सद्दाम पटेल, रेहान शेख, अरबाज शेख, शेख शाहबाज, शेख राहिल, सय्यद नूर, शेख अल्ताफ, फुजैल खान, सलाम खान, जाकिर खान, युसूफ मिर्झा, अदनान खान, अरशद खान, मोहम्मद खान, सय्यद जाकिर, साहिल खान, शेख अफान तसेच इमरान रझा यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून धार्मिक सलोखा अबाधित राखण्यासाठी तसेच समाजात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे.
Previous Post Next Post