*स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या शंका दूर होईपर्यंत सक्तीची कार्यवाही थांबवावी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)**
(वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा)
हिंगणघाट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उपजिल्हाप्रमुख *श्री. सतीश धोबे व तालुकाप्रमुख श्री. मनीष देवडे,शहर प्रमुख श्री सचिन पोटदुखे** यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), हिंगणघाट येथील मा. कार्यकारी अभियंता यांना स्मार्ट मीटर संदर्भात निवेदन देण्यात आले.
सध्या हिंगणघाट शहरात स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असून, याबाबत नागरिकांमध्ये विविध शंका, संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांनी त्यांच्या पूर्वसंमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविले जात असल्याची तक्रार केली असून, स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिल, रिमोटद्वारे वीजपुरवठा खंडित करणे, तक्रार निवारण प्रक्रिया तसेच ग्राहकांच्या अधिकारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे स्थानिक आमदार यांनी सत्तेत असतांना तेही तालिका अध्यक्ष असून सुध्दा सभागृहात प्रश्न मांडत नाही हे विचार करण्यास जनतेला प्रश्न पाडला आहे. परंतु जनतेनी सुध्दा स्थानिक आमदाराच्या भरवश्यावर न राहता यांच्या विरोधात आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. सामान्य जनता अडचणीत आली तरी आमदाराला काहीच फरक पडत नाही.
यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने महावितरण प्रशासनाकडे स्मार्ट मीटर बसविण्याचे नियम, ग्राहकांची पूर्वसंमती, वीजबिलातील संभाव्य वाढ, रिमोट डिस्कनेक्शनची प्रक्रिया, मीटर बिघाड झाल्यास तक्रार निवारण यंत्रणा, ग्राहकांच्या माहितीची गोपनीयता तसेच स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक असल्यास त्यासंबंधीचे शासन निर्णय, MERC आदेश व इतर कायदेशीर आदेशांची माहिती लेखी स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच नागरिकांच्या सर्व शंका व आक्षेपांचे समाधान होईपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याबाबत कोणतीही सक्तीची कार्यवाही करू नये, व्यापक जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना संपूर्ण माहिती द्यावी व त्यांचा विश्वास संपादन करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महावितरण प्रशासनाने नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
निवेदन देताना व तालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, सुनील आष्टिकर, गजानन काठवले, सुभाष काटकर, प्रमोद ऐडलावार, सुरेश गायकवाड, सुरेश चौधरी, अमोल वादाफळे,नितीन वैध, नारायण घ्यारे, रोहन बनसोड, हिरामण आवारी,अनिल कडू, मारोती अराडे,लक्ष्मीकांत भगत,राहुल मोहितकर,गजानन देवढे, सुनील पवार, गणेश वडुले, बलराज डेकाटे,दिपक बागमरे,...... शिवसैनिक उपस्थित होते.
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

