नांदेड जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन गुन्हेगारांचा होणार बंदोबस्त

नांदेड जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन 

 गुन्हेगारांचा होणार बंदोबस्त

(मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड)

नांदेड : दिनांक 24 जून रोजी नांदेड जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून डॉ नीलाभ रोहन,यांनी पदभार स्वीकारला.यापूर्वी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अबिनाश कुमार यांच्याकडून त्याने अधिकृतरित्या कार्यभार स्वीकारला आहे, डॉ.नीलाभ रोहन हे कर्तव्यदक्ष,अभ्यासू आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात विविध, जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रभावी प्रशासकीय कार्य करत, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे, त्यांच्या नियुक्तीमुळे नांदेड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला नवे, नेतृत्व मिळाले असून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्याची अपेक्षा नागरिक व पोलीस प्रशासन यांनी व्यक्त केली आहे, पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. नीलाभ रोहन यांनी,जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय व सुरक्षेची भावना देणे,हे आपले प्राधान्य राहील  असे संकेत दिले,दरम्यान माजी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, जनसंपर्क आणि विविध सामाजिक उपक्रमाद्वारे,नागरिकांचा विश्वास संपादन केला, त्यांच्या कार्याची नांदेड करांकडून प्रशंशा करण्यात आली, नवीन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आगमनानंतर पोलीस दलातील अधिकारी, व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जिल्ह्याच्या, सुरक्षा व्यवस्थेला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे,गुन्हेगारांची कोणत्याही परिस्थितीत खैर केली जाणार नाही व नागरिकांच्या,सुरक्षेबाबत व नागरिकांची सुरक्षा आणि सर्वसामाजिक न्याय,व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या  व्यक्तीवर कठोर कारवाई,केल्या जाईल व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे संकेत यावेळी नांदेड जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांनी संकेत दिले आहे.
Previous Post Next Post