अकोल्यात नगरसेविकेच्या पतीची चाकूने सपासप वार करून हत्या; मुख्य आरोपीला पोलिसांनी जीवाची पर्वा न करता रंगेहात पकडले*

*अकोल्यात नगरसेविकेच्या पतीची चाकूने सपासप वार करून हत्या; मुख्य आरोपीला पोलिसांनी जीवाची पर्वा न करता रंगेहात पकडले*

( अकोला मुख्य जिला प्रतिनिधि इमरान खान मीडिया पोलिस टाईम) 

अकोला:रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जुने शहर भागातील नगरसेविकेच्या पतीवर जुन्या वादातून चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीला रंगेहात अटक केली असून, त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरू केला आहे.अपघाताचा बनाव रचून हल्लामिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ३० जून २०२६ रोजी नगरसेविकेच्या पती याकूब खान युनूस खान हे रेल्वे स्टेशनकडून अग्रसेन चौकाकडे आपल्या ओला इलेक्ट्रिक दुचाकीने जात होते. जिजाऊ हॉलसमोरील रस्त्यावर विरुद्ध दिशेने दुचाकीवरून आलेल्या वसीम अहमद उर्फ चावड्या गुलाम अयुब आणि त्याच्या एका लाल टी-शर्ट घातलेल्या साथीदाराने याकूब खान यांच्या दुचाकीला जाणीवपूर्वक धडक दिली. धडक लागताच याकूब खान रस्त्यावर पडले.त्याच वेळी आरोपी वसीम अहमद याने जुन्या आपसी वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने जवळ असलेल्या चाकूने याकूब खान यांच्या छातीवर, पोटावर आणि डाव्या मांडीवर सपासप वार केले. हल्ला केल्यानंतर वसीमचा साथीदार तेथून पळून गेला, तर वसीम स्वतः पळून जाण्याच्या तयारीत होता.पोलीस हवालदाराची जांबाज कामगिरीघटना घडत असतानाच रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रवीण ढगेकर (ब.नं. ९७) यांनी अत्यंत तत्परता दाखवली. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला (वसीम अहमद) शिताफीने जागीच पकडले आणि पोलीस ठाण्यात आणले.उपचारादरम्यान मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखलघटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या याकूब खान यांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सर्वोपचार रुग्णालय) व नंतर आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी इस्माईल खान याकूब खान यांच्या जबानीवरून सुरुवातीला रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, जखमीचा मृत्यू झाल्यामुळे आता भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) (खून) नुसार गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.वरिष्ठांचे मार्गदर्शन व कारवाईसदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि रामदासपेठचे पोलीस निरीक्षक श्री. शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात पोउपनि संदीप बालोद, सपोउपनि किरण गवई, पोहवा प्रवीण ढगेकर, पोहेकॉ सुरेश लांडे, संदीप वानखडे, पोकॉ रोशन पटले, अनिल धनभर, अभिजित इंगळे, इमाम चौधरी, पुरुषोत्तम डंबेलकर, चालक सुरेंद्र खंडारे आणि प्रवीण पेठे यांनी कामगिरी बजावली. फरार दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
Previous Post Next Post