पातूरमध्ये ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस; नदी-नाल्यांना पूर, आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

पातूरमध्ये ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस; नदी-नाल्यांना पूर, आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

(पातूर, प्रतिनिधी : दूल्हे खान युसुफ खान)

पातूर शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला. अवघ्या काही वेळातच नदी-नाल्यांना पूर आला असून पातूरची बोर्डी नदीही दुथडी भरून वाहू लागली. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

दरम्यान, शनिवारी असलेल्या आठवडी बाजारावरही या पावसाचा मोठा परिणाम झाला. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे बाजारातील व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक व्यापाऱ्यांच्या मालाचे पावसामुळे नुकसान झाले असून आर्थिक फटका बसला आहे. नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Previous Post Next Post