आधार फाउंडेशन, हिंगणघाटच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा. अतुलभाऊ वांदिले यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक .26/7/2026 ला शहालंगडी मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा उत्साहात संपन्न झाला.

आधार फाउंडेशन, हिंगणघाटच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा. अतुलभाऊ वांदिले यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक .26/7/2026 ला शहालंगडी मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा उत्साहात संपन्न झाला.

(हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा)

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हिंगणघाट शहर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात ओम अंबुमाता योग मित्र तसेच गंगामित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले.

यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प करत, "एक झाड – एक जबाबदारी" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, अशा उपक्रमांमुळे निसर्ग संवर्धनाला निश्चितच बळ मिळणार असल्याचे मत कार्यकारी अध्यक्षा सौं. माधुरी विहीरकर यांनी व्यक्त केले. यावेळी आधार फाउंडेशनचे सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post