मुप्टा शिक्षक संघटनेची नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक.
१० ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा.
( माहेमूद पिंजारी
तालुका प्रतिनिधी देगलूर )
देगलूर : दिनांक ४ जुलै २०२६
रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात मुप्टा शिक्षक संघटनेची जिल्हास्तरीय
महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थान संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रा. जालिंदर वाहुळ यांनी भूषविले. बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वैयक्तिक मान्यतेतील चुकीचा नियुक्ती दिनांक दुरुस्त करणे, नियोजित टप्पा वाढीनुसार वेतन अदा करणे, संचमान्यता पूर्वीप्रमाणे कायम ठेवणे, प्राथमिक पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करणे, एनपीएस (NPS) विकल्पाबाबत स्पष्टता आणणे, प्रचलित पद्धतीने टप्पा अनुदान देणे, शिक्षकांना SIR व BLO च्या कामातून मुक्त करणे, १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे तसेच २०१२ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीमधून सूट देणे आदी महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
शिक्षकांच्या या सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत शासन व शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १० ऑगस्ट लागू करणे, एनपीएस (NPS)विकल्पाबाबत स्पष्टता आणणे, प्रचलित पद्धतीने टप्पा अनुदान देणे, शिक्षकांना SIR व BLO च्या कामातून मुक्त करणे, १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे तसेच २०१२ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीमधून सूट देणे आदी महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
शिक्षकांच्या या सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत शासन व शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १० ऑगस्ट२०२६ रोजी नांदेड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय बैठकीत घेण्यात आला.बैठकीचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष हिवराळे पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रा.डी. आर. नागरगोजे यांनी केले. या बैठकीस राज्य उपाध्यक्ष प्रा. मोईन सौदागर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मोहम्मद एजाज, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. महेश कोंडावार, जिल्हा संघटक प्रा. डॉ. चंद्रकांत कुराडे, एजाज तांबोळी, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बालाजी झरे पाटील, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बालाजी इंगळे पाटील, जिल्हा सल्लागार प्रा. अनिल खडसे, प्रा. मेटकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष मनधरणे, प्राचार्य जी. के. कदम, प्राचार्य उत्तम सोनकांबळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

