मेंडकीच्या जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूप
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
(श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफीक गाईड माहूरगड )
माहूर तालुक्यातील अतिदुर्ग डोंगराळ भागात असलेल्या मौजे मेंडकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी अथक परिश्रम करून शाळा डिजिटल केली परंतु प्रांगणामध्ये पेव्हर ब्लॉक टाकलेले नसल्याने या ठिकाणी सखल भाग असल्याने पावसाचे पाणी जमा होऊन डबके साचलेआहे यामध्ये जंतू निर्माण होऊन शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याने येथे तात्काळ पेव्हर ब्लॉक टाकावे अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे
माहूर तालुक्यातील खेड्यापाड्यात असलेल्या अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत बिकट असून अनेक ठिकाणी स्लॅब गळत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे तर अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक भिंती प्रांगणामध्ये पेव्हर ब्लॉक नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे सतत तीन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने शाळेला सुट्टी द्यावी इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे
मौजे मेंडकी हे गावाची दुर्गम भागात असून या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची अवस्था बिकट आहे तरीही शिक्षक शाळेत जाऊन ज्ञानदान करतात परंतु शाळेत जाणाऱ्या रस्त्यात घाण असल्याने विद्यार्थ्यांचे पाय घाणित भरत असल्याने पायात खरुज निर्माण होत आहे तर इतरही रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे येथे वैद्यकीय व्यवस्था व्यवस्थित नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने येथे पेव्हर ब्लॉक टाकावे अशी मागणी शिक्षक विद्यार्थी गावकऱ्यातून होत आहे

