नांदेड येथील मुख्य अभियंता जलसंपदा यांच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वार समोर शिवसेनेचे निदर्शने व हलकी बजाओ आंदोलन.

नांदेड येथील मुख्य अभियंता जलसंपदा यांच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वार समोर शिवसेनेचे निदर्शने व हलकी बजाओ आंदोलन.

(माहेमूद पिंजारी
 तालुका प्रतिनिधी देगलूर )

 देगलूर : महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना वरदान असलेल्या लेंडी धरणातील घळभरणीच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम करत असल्याने या प्रकल्पाच्या कामाची चौकशी करून दोषी अधिकारी तत्कालीन कार्यकारी अभियंता चौगुले व उप अभियंता जाधव यांची व सुजाता कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेड येथील मुख्य अभियंता अरुण नाईक जलसंपदा मुख्यालयाच्या प्रवेशद्वार समोर निदर्शने करुन हलगी आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील,देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे, शिवसेना शहरप्रमुख मष्णाजी पैलावार युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे, विभाग प्रमुख हाणमंत राजुरे लख्खेकर, संजय पाटील मंगरुळे लख्खेकर, राजेंद्र राठोड, हाणमंत मंगरुळे, दयानंद बिरादार बल्लरकर आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.
Previous Post Next Post