​पातुर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी ‘इदु पैलवान’ विराजमान; मोठ्या जल्लोषात पार पडला पदग्रहण सोहळा!

​पातुर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी ‘इदु पैलवान’ विराजमान; मोठ्या जल्लोषात पार पडला पदग्रहण सोहळा!

(​पातुर: अकोला तालुका प्रतिनिधी दुल्हे खान)

पातुर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष हृदयात खा रूम खा ऊर्फ इदु पैलवान यांचा पदग्रहण सोहळा आज अत्यंत उत्साही आणि ऐतिहासिक वातावरणात, मोठ्या जल्लोषात पार पडला. सकाळी ठीक १० वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली. पातुर पालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे शहरवासीयांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पातुरवासियांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांना भव्य पुष्पगुच्छ आणि फुलांचे मोठे हार अर्पण करून त्यांचे जंगी स्वागत केले. संपूर्ण परिसरात ढोल-ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
​राजकीय नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
​या सोहळ्याला आमदार साजिद खान पठाण परसरामजी उंबरकर बाळापूरचे नगराध्यक्ष जमील भाई, सय्यद कमरुद्दीन मास्टर मोहम्मद शब्बीर अली मुख्तार सरकाँग्रेस तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे (उभाटा) गटाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
​नवनिर्वाचित नगरसेवकांची मांदियाळी
​या सोहळ्याला नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांनी उपस्थित राहून एकजूट दाखवली. यामध्ये नवनिर्वाचित निवडून आलेले सदस्य
​मोहम्मद शाकीर मोहम्मद साबीर,
​मोहम्मद मेहताब अ. रउफ,
​ साद अहमद खान अजगर खान,
​अजय गजानन पाटील,
​आनंद रामभाऊ तायडे,
​सौ. सुनीता साहेबराव वाघमारे,
​सौ. शितल प्रवीण पोहरे,
​सौ. ममता राजेश खोडे,
​सोफिया सदक शेख उस्मान,
​हुसेना बी सय्यद अजीम,
​या सर्व लोकप्रतिनिधींचेही नागरिकांनी स्वागत केले.
​प्रशासन आणि नागरिकांची मोठी उपस्थिती
​नगराध्यक्षांनी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला, त्यावेळी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख, कर्मचारी वर्ग आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​"शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन," अशी ग्वाही पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष इदु पैलवान यांनी यावेळी दिली.
Previous Post Next Post