*पातूर-अकोला महामार्गावर दुचाकी अपघात; राजनखेड येथील युवक गंभीर जखमी*
(पातूर, तालुका प्रतिनिधी : दूल्हे खान युसुफ खान)
अकोला महामार्गावर अकोल्याकडून पातूरकडे येत असलेल्या एका युनिकॉर्न दुचाकीचा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 43 सीबी 0784 क्रमांकाच्या युनिकॉर्न दुचाकीवरील राजेश ब्रह्मदास राठोड (रा. राजनखेड) यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात राजेश राठोड गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांचे तारासिंग राठोड, इस्माईल मुल्ला तसेच पोलीस शिपाई साबे, पत्रकार दूल्हे खान यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेतील डॉ. फैजान जागीरदार व वाहनचालक राहुल बोर्डे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी पातूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

