ज्येष्ठ पत्रकार सोबत ठाणेदाराचे असभ्य वर्तन; पत्रकार संघाकडून तीव्र निषेध

ज्येष्ठ पत्रकार सोबत ठाणेदाराचे असभ्य वर्तन; पत्रकार संघाकडून तीव्र निषेध

(मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )


हिंगणघाट चे ज्येष्ठ पत्रकार अब्बास खान यांच्यासोबत स्थानिक पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल राऊत यांनी गैरवर्तणुक केली होती. या घटनेचा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रविवार, दिनांक ५ जून २०२६ रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल राऊत यांनी ज्येष्ठ पत्रकार अब्बास खान यांच्याशी अत्यंत असभ्य आणि चुकीच्या भाषेत वर्तन केले. या घटनेमुळे पत्रकार वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जातात. समाजात घडणाऱ्या घटना सत्य स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याचे जबाबदार काम ते करत असतात. अशा परिस्थितीत एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याकडून पत्रकाराशी उद्धट वर्तन होणे हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जर पत्रकारांसोबत अशा प्रकारची घटना घडत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्याशी होणारे वर्तन कसे असेल, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. पत्रकारांच्या वतीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गैरवर्तनाबाबत तात्काळ खुलासा करावा आणि भविष्यात पत्रकारांशी अशा प्रकारचे वर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी ठाम भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे. निवेदन सादर करतांना हिंगणघाट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश वणीकर, हिंगणघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण वैद्य,पत्रकार विजय राठी,सतीश वखरे, भास्करराव कलोडे,राजेंद्र राठी, संदीप रेवतकर, अनिल अवस्थी, नरेंद्र हाडके,राजेश कोचर, संजय अग्रवाल ,मोहम्मद रफीक,प्रदीप (सोनू) आर्य, अजय मोहोड, राजेश कोचर,दशरथ ढोकपांडे, मुकेश चौधरी, रवी येनोरकर, रमेश लोंढे, केवलदास ढाले,शेख जावेद, प्रमोद जुमडे, सैय्यद जाकीर,केशव तितरे,कदीर बख्श आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.
Previous Post Next Post