बंडूजी पाल यांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न
(राजु कांबळे
मिडिया पोलीस टाईम
वर्धा नागपूर अमरावती विभागीय संपादक)
समुद्रपूर : (30 जून ) रोजी विकास विद्यालय, गिरड येथे सत्कार मूर्ती बंडूजी पाल ( शिपाई) यांचा (सपत्नीक सुरेखा बंडूजी पाल)सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य / मुख्याध्यापक माननीय श्री. विकासजी सोनकुसरे साहेब यांच्या हस्ते सत्कार मूर्ती चा ( सपत्नीक) शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला..
सोनकुसरे साहेब, प्रमुख अतिथी श्री. उमेश वाणी ( ज्येष्ठ शिक्षक) अभिजित डाखोरे सर, सुहास चाफले सर, कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील येणोरकर सर, आतिश देवतळे सर, यांनी सत्कार मूर्ती विषयी आपल्या मनोगतातून सत्कार मूर्ती एक प्रामाणिक, आदर्श व्यक्तिमत्व, कार्यालयीन कामकाजात पारंगत अशी मांडणी करीत हीच सत्कार मूर्तीला केलेल्या कामाची पावती होय असे व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात सत्कार मूर्तीचे परिवार अंकिता प्रफुल कठाने, प्रफुल नागोराव कठाने, कृष्णाजी विष्णुजी पाल, वंशिका प्रफुल कठाने, रसिका प्रफुल कठाने उपस्थित होते. तर शाळेचे शिक्षक संदीप महाकाळे , राजु कांबळे, सुनील धुळे, रवी गायकवाड, अर्चना चांगले, पूजा अग्निहोत्री, तनु गलांडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बारोकर तर आभार सुहास चाफले सर यांनी केले.

