स्वच्छ गोठा – निरोगी पशुधन; दिग्रस येथे गोठा स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रात्यक्षिक

स्वच्छ गोठा – निरोगी पशुधन; दिग्रस येथे गोठा स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रात्यक्षिक

(पातुर अकोला तालुका प्रतिनिधी दूल्हे खान)

अकोला | पशुधनाचे आरोग्य जपण्यासाठी गोठ्याची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन करत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, शिरला अंधारे, ता. पातूर, जि. अकोला येथील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आगीखेड येथे "गोठा स्वच्छता व निर्जंतुकीकरण" या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित केले.

विद्यार्थि जय गोंडचवार , प्रणव वाडेकर , जय साबळे , सुमित मुंजाल यांनी गोठ्यामध्ये साचणारा कचरा, शेण व सांडपाणी यांची योग्य विल्हेवाट कशी लावावी, तसेच रोगकारक जंतूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया कशी राबवावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले.

यावेळी पशुधनामध्ये आढळणारे संसर्गजन्य रोग, त्यांची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती देण्यात आली. स्वच्छ व हवेशीर गोठ्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारते, दूध उत्पादनात वाढ होते आणि उपचारावरील खर्च कमी होण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
Previous Post Next Post