वाढदिवसाला रक्तदान शिबिर, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासली - भगिरथ धोटे
महेंद्र मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आलुभात वितरण
(मीडीया पोलीस टाईम भंडारा जिल्हा प्रतिनिधी सुफियान शेख)
भंडारा:- मानवानी स्वतःच्या स्वार्थापोटी वृक्षांची बेसुमार कत्तल केली आहे. त्याचा परिणाम ऋतू चक्रात होत आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्यांना समोर जावे लागत आहे. आणि कोरोना (कोव्हीड) मध्ये कित्येकांना ऑक्सीजन अभावी मृत्युमुखी पडावे लागले. तेव्हा वृक्षाचे महत्व सर्वांना कळले आहे. म्हणून पुथ्वीवर जगणाऱ्या प्रत्येक मानवाने आपल्या वाढदिवसाला नागरिकाकरिता आलुभात वितरण करून रक्तदान शिबिराबरोबर वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असे प्रतिपादन ओबीसी संघर्ष समितीचे भगिरथ धोटे यांनी केले.
ते महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशन भंडारा व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण पेठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी येथे आलुभात व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण पेठी मध्ये रक्तदान शिबीर तसेच गुंथारा येथे वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
त्यावेळी जिल्हा प्रहार संघटनेचे प्रमुख अंकुश वंजारी, नगर सेवक शिव आजवले, महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशनचे उपाध्यक्ष क्रिष्णा उपरिकर, अध्यक्ष महेंद्र मेंढे, शारदा पडोळे, ओबीसी संघर्ष समितीचे भगिरथ धोटे, विजय ब्राह्मणकर, बबलू खान, पवन मस्के, निंबार्ते, प्रा. अशोक चुटे, पी. बी. फुंडे, हत्तीमारे, सार्वे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. विजय कुनघाडकर, डॉ. मयुरी आचार्य, नंदगोपाल फाऊंडेशनचे कार्यकर्ते विलास केजरकर, रक्त संक्रमण विभागाचे प्रशांत बडोले, दिवानजी आकाश कटणकर, नागेश ताईतकर, जितेंद्र ढेंगे, लोकेश गाढवे, प्रमोद हजारे व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.
मेंढे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी, शेतमजूर व व्यापारी वर्गाला आलुभात वितरण करून वृक्षारोपण व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण पेठीत रक्तदान करण्यात आले.
मानव हा बुध्दीमान प्राणी आहे. तो सर्वांच्या कल्याणाकरिता वेळ वाढतो. मात्र स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देत नाही. म्हणून माणसाला चांगले आयुष्य जगायचे असल्यास रोज योग प्राणायाम करावे. तसेच रूग्णांच्या व समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर हे रक्तदान करण्यासाठी सदैव अग्रेसर राहत असतात. त्यांनी आजपर्यंत ९२ वेळा रक्तदान केले. त्यांचा आदर्श तरूण मंडळींनी घेण्याचे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. विजय कुनघाडकर यांनी केले. व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशन भंडारा चे संस्थापक अध्यक्ष महेंद्र मेंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले. केक कापून सर्वांना आलुभात वितरण करण्यात आला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशन भंडारा चे संस्थापक अध्यक्ष महेंद्र मेंढे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. रक्तदान शिबिरात राहुल गोन्नाडे, प्रज्वल हीरीधन, विक्की गभणे इत्यादींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यावेळी अनेकांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद चकोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार विलास केजरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण पेठीतील खुशाल झाडे, राहुल बान्ते, हनुमंत गुट्टे, रवि बोरकर, ज्ञानेश्वर सोलंकी, अतुल मेंढे, निखिल केवट, विनोद सार्वे, सुरेश कटणकर, गोलू गाढवे, राहुल घडिले, अक्षय ईळपाचे, अनुराधा मेश्राम, पिंकी शेलारे, कांचन खोब्रागडे, धर्मेंद्र भोंडेकर व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनी सहकार्य करून शुभेच्छा दिल्या आहेत.

