भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके तर्फे राज्यसभा खासदार राजेंद्र जैन व विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांचा जाहीर सत्कार...भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आधुनिकीकरण करणार - खासदार राजेंद्र जैन..नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन व आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचा भंडाऱ्यात अनेक ठिकाणी जाहीर सत्कार..जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार - आमदार अविनाश ब्राह्मणकर..

भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके तर्फे राज्यसभा खासदार राजेंद्र जैन व विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांचा जाहीर सत्कार...

भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आधुनिकीकरण करणार - खासदार राजेंद्र जैन..

नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन व आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचा भंडाऱ्यात अनेक ठिकाणी जाहीर सत्कार..

जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार - आमदार अविनाश ब्राह्मणकर..

(भंडारा जिल्हा प्रतिनिधी सुफियान शेख)

दि. भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भंडारा यांच्या वतीने बँकेच्या मुख्य शाखेत बँकेचे संचालक तथा निर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन आणि नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य अविनाश बाह्मणकर यांचा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात जाहीर सत्कार करण्यात आला.
         या कार्यक्रमाला आमदार राजूभाऊ कारेमोरे, नाना पंचबुद्धे, जयंत वैरागडे, रामदास शहारे, पांडुरंग खाटीक, जगदीश निंबार्ते, धनंजय दलाल, हेमंत महाकाळकर, महेंद्र गडकरी, श्रीकांत वैरागडे, देवेंद्र चौबे, लोमेश वैद्य, चेतन डोंगरे, विनय मोहन पशीने, आशु गोंडाने, राजू हाजी सलाम, शेखर बोरसे, धनंजय ढगे, मनीष वासनिक, लोकेश नगरे, अमन मेश्राम, सुनील साखरकर, शेखर गभणे, नरेश भगत, नंदू झंझाळ, रुपेश टांगले, आरजू मेश्राम, राहुल निर्वाण, शैलेंद्र पशीने, परवेज काझी, तसेच दी. भंडारा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचे गणमान्य सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
      उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन व आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.
उपस्थितांनी दोन्ही - लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी संसदीय व विधिमंडळातील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. 
      सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व आणि योगदान महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वासही व्यक्त करून भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आधुनिकीकरण करणार असे प्रतिपादन खासदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केले.
       सत्कार सोहळ्यात राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांनी बँकेने केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनीही सहकार चळवळ बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी
सकारात्मक निर्धार बजावण्याचा विश्वास व्यक्त केला.
        यावेळी दी. भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश मदान यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्यवस्थापक प्रशासन विशाल भोंगाडे यांनी मानले.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे गणमान्य सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post