रोठा येथे युवा क्रांती फाऊंडेशनतर्फे शासकीय योजना, कर्ज व रोजगार मार्गदर्शन सेमिनार संपन्न
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
रोठा (प्रतिनिधी): युवा क्रांती फाऊंडेशनच्या वतीने राणू माता मंदिर देवस्थान, रोठा येथे नागरिकांसाठी शासकीय योजना, विविध प्रकारची कर्जे तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शनपर सेमिनार उत्साहात पार पडला.
या सेमिनारमध्ये शेतकरी कर्ज, पर्सनल लोन, एज्युकेशन लोन, होम लोन, शेतकरी योजना, हिरकणी योजना, एज्युकेशन योजना, प्रभाग पुरुष योजना, कुटुंब योजना तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. युवक-युवतींना रोजगाराच्या संधी, आवश्यक कागदपत्रे व योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात देवांश आचार्य, छाया दिलीप वाटकर, मालू मंडलिक, गायत्री राऊत, निता होरे, स्वाती मरसकोले, संगीता गावंडे आणि उज्वला ताई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विविध घटकांतील नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि युवक-युवतींनी या सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
युवा क्रांती फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे शासकीय योजना आणि रोजगाराच्या संधींबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून, भविष्यातही अशाच मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

