८ ला नाभिक समाजाच्या गुणवंत विद्यार्थींचा सत्कार समारंभाचे आयोजन 👇

८ ला नाभिक समाजाच्या गुणवंत विद्यार्थींचा सत्कार समारंभाचे आयोजन 

(मीडिया पोलीस टाईम मराठवाडा विदर्भ संपादक अब्दुल कदिर)

विलास केजकर
भंडारा :- महाराष्ट्र नाभिक महामंडळ भंडारा, जिल्हा शाखा यांच्या वतीने ८ ऑगस्ट २०२६ ला सकाळी ११ वाजता जलाराम मंगल कार्यालय येथे समाजभूषण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
         कार्यक्रमाचे उद्‌घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात  येणार आहे. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पूर्व विदर्भाचे विभागीय अध्यक्ष अशोक सालोटकर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मधुरा मदनकर, जिल्हा कारागृह  अधीक्षक ब्रम्हाजी चोपकर, लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने, विभागीय युवा मंच अध्यक्ष शरद उरकुडे, जगदीश सूर्यवंशी, माया लांजेवार उपस्थित राहाणार आहेत. 
       या कार्यक्रमात गुंणवंत विद्यार्थी, खेळाडू, नवनियुक्त सदस्य आणि विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व नाभिक समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रमोद मेश्राम, युवा मंचचे सुधीर उरकुडे, शोभा देवेकर यांनी केले आहे. तरी संबंधितांनी अधिक माहितीसाठी जिल्हा उपाध्यक्ष राजू सूर्यवंशी ९५७९९२८७३२ यांच्याशी संपर्क साधावे असे कळविण्यात आले आहे.
Previous Post Next Post