धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर,काकरोज (CJP )जनता पार्टीकडून अभिवादन; 'जेन झी' तरुणांच्या लढ्याला सलाम*
(मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
दिनांक २७ जुलै २०२६
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, महात्मा गांधी प्रतिमा, कारंजा चौक काकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने एका विशेष कॅन्डल मार्च अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात 'जेन झी' (Gen Z) तरुणांनी दाखवलेला अभूतपूर्व संघर्ष आणि त्यांच्या योगदानाचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी सांगितले की, दिल्लीत सुरू असलेल्या देशातील तरुण पिढीच्या (Gen Z) आक्रमक आणि डिजिटल लढ्यामुळेच सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि जमिनीवरील थेट संघर्ष यांच्या जोरावर या तरुणांनी लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली. या तरुण पिढीच्या आंदोलनातून "संविधानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही" हा खणखणीत संदेश देशभर पोहोचला आहे.
यावेळी काक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पक्ष हा संविधान, सामाजिक न्याय, समानता आणि विशेषतः युवकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी सातत्याने संघर्ष करत राहील. देशातील तरुण पिढी ज्या जागरूकतेने आपल्या हक्कांसाठी लढत आहे, त्यांना पक्षाचा नेहमीच पाठिंबा असेल. लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि संविधानाचा सन्मान हीच पक्षाची मुख्य भूमिका आहे.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने काक्रोच जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते अजय मूळे, रोहित राजूत, प्रशांत कंडे, हिमांशू गावंडे, रोशन वांदिले, आयुष सोनटक्के, ऋतिक रूडी, वैभव भानखेडे या तरुणांनी पुढाकार घेत सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच शहरातील प्रमुख नागरिक प्रवीण कडू, अनिल मुन, रमेश राजूरकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक आणि काकरोच जनता पार्टीचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

