लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा : सचिन साठे राष्ट्रीय अध्यक्ष
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकार घेत असलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण अ ब क ड निर्णयाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज तसेच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सिल्लोड तालुका यांच्या वतीने संविधानीक न्याय हक्क महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.
एक ऑगस्ट २०२४ रोजी मा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत तसेच राज्य सरकारने मा. न्यायमुर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या बदर समितीने सुद्धा त्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय जाहीर करावा व त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातु तथा ए बी एस क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांनी मोर्चाला संबोधित करताना महाराष्ट्र सरकाला केली आहे.
यावेळी सकल मातंग समाज तसेच आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सिल्लोड तालुका यांच्या वतीने परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा सिल्लोड तहसिलच्या तहसिलदार अंकीता ताकभाते यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले.
यावेळी लहुजी क्रांती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकराव कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष सखाराम आहीरे, भारतीय दलीत संसदेचे अध्यक्ष अंबादास सगट, लहुजी क्रांती सेनेचे प्रदेश सचिव कैलास पाजगे, अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष राजु भालेराव, लहुजी क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांनी मोर्चाला संबोधित केले.
सदरील मोर्चाचे सुत्रसंचलन फकीरचंद तांबे यांनी केले तर आभार विजय खाजेकर यांनी मानले.
यावेळी कमलताई घाडगे, सुवर्णाताई साबळे,सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोनवणे,विष्णू सोनवणे,नामदेव खेत्रे, सोमिनाथ भालेराव,सुधाकर कासारे, विनायक वाघुले,संजय कांबळे,सागर खेत्रे, संजय आहीरे,कैलास खरात, समाधान गायकवाड,अशोक शिंदे,बाबुराव आहीरे,संजय मोरे, समाधान लोखंडे,फकिरचंद तांबे,साहेबराव आहीरे, साहेबराव दनके,रतन अंभोरे, सुखदेव कांबळे,शिवराम कांबळे, सर्जेराव शेजुळ,राजेंद्र गोफणे,किसन सौदागर, रविंद्र महाले, दुर्गादास जाधव, सखाराम भिसे,कचरु उन्होने ,महेंद्र आहीरे, विष्णु सौदागर, ज्ञानेश्वर नाडे,समाधान कांबळे,भगवान सोनवणे,सुनिल आहीरे,विशाल आहीरे ,बाजीराव कांबळे,विठ्ठल कांबळे,आकाश आहीरे, कैलास मोरे,विष्णु साळवे,अमोल खेत्रे,किशोर भिसे,दिपक कांबळे, विलास घोरपडे, दत्तु आहीरे, संदीप चंदनशिवे, कैलास भाले,मच्छींद्र बहीलम, दिपक लोखंडे,रवि दनके, सतिश शेलार,नितीन दनके, गजानन कांबळे, विठ्ठल खोतकर, रमेश आहीरे,आनंदा खेत्रे, नितीन सौदागर,प्रदीप साठे,सोमिनाथ कांबळे,संजय पारधे, पुंजाराम कांबळे,आकाश गायकवाड, जनार्दन दनके, कृष्णा सोनवणे,अमोल काकफळे, गजानन चंदनशिव, सुभाष कांबळे, कपिल शेजुळ,आनंद गायकवाड,आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

