WKC वर्धा कराटे चॅम्पियन ग्रुपचा उद्धघाटन सोहळा संपन्न. योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर एक सामान्य विद्यार्थीही उत्कृष्ट खेळाडू बनू शकतो : ...पवनभाऊ तिजारे

WKC वर्धा कराटे चॅम्पियन ग्रुपचा उद्धघाटन सोहळा संपन्न.

 योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर एक सामान्य विद्यार्थीही उत्कृष्ट खेळाडू बनू शकतो : ...पवनभाऊ तिजारे 

(राजू कांबळे 
मीडीया पोलीस टाईम 
वर्धा,अमरावती, नागपूर विभागीय संपादक )

    69 वर्षानंतर पहिल्यांदा वर्धा जिल्ह्यात आंतरशालेय कराटे क्रीडा स्पर्धेत पाच सुवर्णपदकाची कमाई करून ऐतिहासिक कामगिरी करत भारतात सर्वाधिक स्वर्णपदक प्राप्त करणाऱ्या जिल्ह्याच्या यादीत वर्धा जिल्ह्याचा पहिला क्रमांक आला होता. ही यशस्वी परंपरा पुढेही अविरत नेण्यासाठी सर्व प्रशिक्षक आणि कराटे खेळाडूंना एकत्र आणणारे 'वर्धा कराटे चॅम्पियन (WKC)' हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.

       वर्धा जिल्ह्यात कराटे खेळाच्या विकासासाठी आणि गुणवंत खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने वर्धा कराटे चॅम्पियन (WKC) या व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता झूम कॉम्प्युटर, मालगुजारी पुरा, वर्धा येथे आयोजित करण्यात आला होता.

      ग्रुपचे उद्घाटन एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमी, वर्धाचे संचालक मा. श्री. पवनभाऊ तिजोरे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.

 याप्रसंगीत प्रमुख अतिथी म्हणून सिनियर कराटे प्रशिक्षक शिहान शेख दत्तू सर, ग्रुपची संकल्पना मांडणारे वुशू स्पोर्ट असोसिएशन, वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष सेन्साई निलेश राऊत, ग्रुपचे संचालक कराटे - डो स्पोर्ट्स असोसिएशन, वर्धा जिल्ह्याचे सचिव शिहान मंगेश भोंगाडे, मान्यता प्राप्त जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सेन्साई काशिनाथ रघाटाटे, चॅम्पियन टीमचे कॅप्टन सेन्साई कार्तिक भगत, ऑल इंडिया पोलीस गेम पदक विजेते सेन्साई दयाल धवणे, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कलर कोट खेळाडू सेन्साई तेजस निवल व इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

      पवनभाऊ तिजारे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी कराटे खेळ हा सर्वोत्तम मार्ग आहे. नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर एक सामान्य विद्यार्थीही उत्कृष्ट खेळाडू बनू शकतो. खेळामुळे पराभव पचवण्याची ताकद, विजय नम्रतेने स्वीकारण्याची वृत्ती आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला खेळासाठी प्रोत्साहन द्यावे.

       ग्रुपमध्ये आधुनिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्याकरिता रामनगर, कृष्णनगर, पिपरी (मेघे), समता नगर, सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे) व इत्यादी शाखेचे आजी-माजी उत्कृष्ट खेळाडू कराटे खेळाचा सराव करण्याकरिता उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे संचालन कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय पंच  सेन्साई पूजा गोसटकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते खेळाडू देवांशु लाखे व नैतिक राऊत यांनी व्यक्त केले.
Previous Post Next Post