प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी प्रचंड दबाव आहे. पण धर्मेंद्र प्रधान ओडिसा राज्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत. तिथे एकूण २१ लोकसभा पैकी २० जागा भाजपने जिंकल्या आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी प्रचंड दबाव आहे. पण धर्मेंद्र प्रधान ओडिसा राज्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत. तिथे एकूण २१ लोकसभा पैकी २० जागा भाजपने जिंकल्या आहेत. 

(रायगड जिल्हा विभागीय संपादक)

नरेंद्र मोदी आणि संघाचं डिलिमिटेशनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा २० खासदारांचा आकडा खूप महत्त्वाचा आहे. शिवाय ते १९८३ पासून भाजपच्या अभाविपचे कार्यकर्ते होते. २००० मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. ते राज्यसभेचे आणि लोकसभेचे खासदार राहिले आहेत. ते ओडिसा राज्यातील भाजपचे एक महत्त्वाचे नेते आहेत. 
२) दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी मागिल बारा वर्षात झालेली सर्व आंदोलने मोडित काढली असून आता हा राजीनामा घेणं हे त्यांच्या अहंकाराच्या आड येत आहे. आजपर्यंत त्यांनी विरोधकांना ED, CBI, पोलिस आणि अशा यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवून टाकले होते. ही आंदोलनातील पोरं कशालाच घाबरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अहंकारी स्वभावाला हा राजीनामा पटण्यासारखा नाही. 
काल रात्री उशिरा दबावाखाली येऊन त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला पण Gen Z आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. 
एकदा का धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला की पेट्रोल मध्ये इथेनॉल मिसणाऱ्या नितीन गडकरी यांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन होईल. त्यानंतर अशी आंदोलने होतंच राहतील. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मोदी सरकारच्या गळ्यातील हड्डी बनले आहे, गिळता ही येत नाही आणि बाहेर काढता ही येत नाही. 
जेन झी कोणाला ही विनाकारण घाबरत नाही आमच्या काळात म्हणजे मिलेनियमच्या काळातील अगदी बोटावर मोजता येण्यासारखी लोकं पोलिसांचा सामना करू शकत होती. बाकीचे तर फक्त पोलीस आले म्हणलं की बाजूने निघून जाण्यात धन्यता मानतं.

#प्या_रे_मित्रो 
#राजीनामा
तुकाराम गव्हाणे पाटील साभार...
Previous Post Next Post