*दहिहांडा पोलीसांनी दिले ०२ गोवंशाना जिवदान*
(मीडिया पोलिस टाईम अकोला जिल्हा विभागीय संपादक इमरान खान)
अकोला:दिनांक २३/०७/२५ रोजी वंचीत बहुजन आघाडी पक्षाचे वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहान केले असल्याने महाराष्ट्र बंद बंदोबस्ता दरम्यान दहिहांडा पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की एक चारचाकी वाहनामध्ये ०२ गोवंश जातीचे बैल कत्तलीकरीता दर्यापुरकडुन दहिहांडा गावाकडे येत आहेत अशा माहीतीवरून दहिहांडा पोलीसांनी दहिहांडा गावाचे बाहेर असलेल्या दहिहांडा ते दर्यापुर रोडवर नाकाबंदी करून एक टाटा एस गाडी क्रमांक एम एच ०४ केएफ १३८८ थांबवुन पाहणी केली असता सदर टाटा एस वाहनामध्ये ०२ गोवंश जातीचे बैल निर्दयतेने बांधलेले दिसले सदर वाहन चालक यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख इजाज शेख बशीर वय २२ वर्षे रा. दहिहांडा ता.जि. अकोला असे असल्याचे सांगीतले सदर गोवंश बैलाबाबत मालकी हक्काबाबत विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिले वरून सदर जनावरे अवैधपणे कत्तलीकरीता घेवुन जात असल्याची खात्री झालेवरून सदर टाटा एस वाहन क्रमांक एम एच ०४ केएफ १३८८ किं.अं.४,००,०००/रू व दोन गोवंश जातीचे जनावर बैल १) एक लाल धामणा रंगांचा बैल वय अंदाजे १४ वर्षे शिंगे दोन्ही उभे शेपुट गोंडा काळ, अशक्त उपाशीपोटी शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेला कि.अं.४०,०००/रू, २)) एक पांढ-या रंगाचा बैल, शिंगे दोन्ही आडवे शेपुट गोंडा काळा, अशक्त उपाशीपोटी शरीरावर ठिकठिकाणी जखमा वरा अं. १५ वर्षे, कि.अं. ३०,०००/रू असे एकुण ४,७०,०००/रू चा मुददेमाल जप्त करून सदर आरोपीविरूध्द महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम व भान्यासं प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अचिंत चांडक सा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत रेडडी सा, मा. सहायक पोलीस अधिक्षक श्री निखील पाटील सा. उपविभागीय कार्यालय अकोट यांचे मार्गदर्शनामध्ये सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले ठाणेदार पोलीस स्टेशन दहिहांडा व पोहवा. रविराज डाबेराव, पोकॉ. प्रदीप तायडे, पो. कॉ. प्रमोद दळवी यांनी केली

