अकोल्यात हजरत ताजुद्दीन बाबा रहमतुल्लाह अलैह यांच्या १०४ व्या संदल मुबारकनिमित्त लंगर सेवा समिती, तारफैल यांच्या वतीने भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो अकीदतमंदांनी सहभाग घेत श्रद्धा व्यक्त केली.

अकोल्यात हजरत ताजुद्दीन बाबा रहमतुल्लाह अलैह यांच्या १०४ व्या संदल मुबारकनिमित्त लंगर सेवा समिती, तारफैल यांच्या वतीने भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो अकीदतमंदांनी सहभाग घेत श्रद्धा व्यक्त केली.

(अकोला मुख्य जिल्हा प्रतिनिधी इमरान खान)

समितीचे अध्यक्ष नसीर बाबा यांच्या नेतृत्वाखाली निघालेली संदल मिरवणूक तारफैल येथून सुरू होऊन माणिक चौक, सिटी कोतवाली, गांधी रोड, नवा बसस्थानक मार्गे रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचली. संपूर्ण मार्गावर भाविकांनी फुलांची उधळण करून संदलचे उत्साहात स्वागत केले.
या सोहळ्यात रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे,  शिवसेना नेते आकाश भाऊ, डॉ. अल्लामा रफीक आलम हुसेनी, जब्बार बाबा, अबुल उलई गुलाब बाबा नक्शबंदी, काझी इफ्तेखार हुसेन साहेब (बाळापूर), अनीस भाई नक्शबंदी, हनीफ बाबा नक्शबंदी, ताज बाबा नक्शबंदी, राजू बाबा उर्फ साहिल साहेब, ॲड. नजीब शेख, वसीम साहेब, महमूद खान पठाण, साहिल फाझिल, इसरार उर्फ मम्मू भाई, वाहिद खान ठेकेदार, रसूल भाई फोटोग्राफर, बी. एस. सीरसागर, आकाश भाऊ, नंदू कदम, लुकमान, ताज कव्वाल, जमाल कव्वाल व त्यांची पार्टी, नूर भाई साउंड वाले, रफीक ठेकेदार, मोसीन भाई, अदनान, विजू, वीर, बाडू नदागवडी, रियाज भाई, इमरान भाई, शेख अलीम, शेख मुर्तजा, शेख मिराज, शेख राजा, शेख सिराज, मोहम्मद अली, शकीरा हुसेनी, नदीम खान आणि शेख मुजम्मिल यांच्यासह मोठ्या संख्येने अकीदतमंद उपस्थित होते.
संदल मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी रामदासपेठ पोलीस ठाण्याचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे स्वतः बंदोबस्तावर उपस्थित राहून संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवत होते. त्यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते. 

श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक सलोखा यांचे दर्शन घडवणाऱ्या या भव्य संदल मिरवणुकीमुळे अकोला शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
Previous Post Next Post