यावल तालुक्यातील आडगाव गावात अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात पोलीस पाटील अपयशी; निवेदनानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

यावल तालुक्यातील आडगाव गावात अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात पोलीस पाटील अपयशी; निवेदनानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’
ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी 

जळगाव जिल्हा च्या यावल तालुक्यातील आडगाव गावात राजरोसपणे सर्रास सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक आणि शांततेचे वातावरण बिघडत आहे. या अवैध दारू व्यवसायावर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक पोलीस पाटील यांना नुकतेच रीतसर निवेदन देण्यात आले होते. मात्र, निवेदन देऊनही पोलीस पाटलांकडून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जात असून, आतापर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गावात ठिकठिकाणी अवैध दारूची विक्री सुरू असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत ढकलली जात आहे. दारूमुळे अनेक कुटुंबांची वाताहात झाली असून, गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना घराबाहेर पडणे किंवा रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. गावात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस पाटील हे महत्त्वाचे माध्यम असतात, परंतु याप्रकरणी त्यांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
निवेदन देऊनही पोलीस पाटलांनी कोणत्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने, आता ग्रामस्थ व महिला वर्ग आक्रमक मोडमध्ये आले आहेत. "गावातील दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास आणि संबंधित पोलीस पाटलांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास, आम्ही पोलीस अधीक्षक (SP), राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Dept.) आणि तहसीलदारांकडे तक्रार करणार आहोत. तसेच गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आता तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी हस्तक्षेप करून गावात अवैध दारूबंदी लागू करणार का आणि निष्क्रिय पोलीस पाटलांवर काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
(आडगाव येथील सर्व महिला व पुरुष ग्रामस्थ
Previous Post Next Post