१ ऑगस्टपासून अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई*

*१ ऑगस्टपासून अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई* 

(मीडिया पोलिस टाईम अकोला जिला विभागीय संपादक इमरान खान)


अकोला:अकोला जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट २०२६ पासून दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या निर्णयापूर्वी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दहा दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली. तसेच २० जुलैपासून सर्व शासकीय कार्यालये, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान आतापर्यंत २५५ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विना हेल्मेट वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. बहुतांश अधिकारी व कर्मचारी आता हेल्मेटचा वापर करूनच कार्यालयात येत आहेत.
पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले आहे. १ ऑगस्टपासून हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच नियमानुसार वाहनचालकाचा परवाना (Driving Licence) निलंबित किंवा रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Previous Post Next Post