महालगाव (बु) गुरुदेव सेवा मंडळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मूर्ती भेटस्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम...आमदार करणजी देवतळे यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न..

महालगाव (बु) गुरुदेव सेवा मंडळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मूर्ती भेट

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

आमदार करणजी देवतळे यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न

( महेश निमसटकर
 जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)



भद्रावती, प्रतिनिधी : 10:- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ट्रस्टच्या 'विदेही सद्गुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन' अभियानांतर्गत वरोरा तालुक्यातील महालगाव (बु.) येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भव्य मूर्ती भेट देण्यात आली.

या मूर्ती प्रदान सोहळ्याचे उद्घाटन वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करणजी देवतळे व त्यांच्या पत्नी सौ. वेदांती करण देवतळे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.

यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त रवींद्र शिंदे उपस्थित होते.

ग्रामीण भागात संत विचारांचा प्रसार व्हावा, समाजात प्रबोधनाची चळवळ अधिक बळकट व्हावी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचारांचा जनमानसात प्रसार व्हावा, या उद्देशाने ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान श्री गुरुदेव सेवा मंडळ, महालगाव (बु.)चे अध्यक्ष विलास तिखट व मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मूर्ती अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने स्वीकारली.

याप्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात संत परंपरेचे जतन आणि समाजप्रबोधनासाठी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे महालगाव परिसरात सर्वत्र स्वागत होत असून, उपस्थितांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले.
Previous Post Next Post