*हिंगणघाट जिल्हा घोषित करा या सह विविध मागणीचे शुभांगी डोंगरे यांचे पालकमंत्र्याना निवेदन*
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
हिंगणघाट उपविभागाला जिल्हा म्हणून मान्यता देण्यात यावी, शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक सुरु करण्यात यावे, स्वच्छता गृहाची बाजारात निर्मिती करण्यात यावी, व दलीत वस्ती निधीची चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन पालक मंत्री डॉ पंकज भोयर यांना दि 12 जुलैला राका (शरद पवार ) पक्षाच्या नेत्या व माजी नगरसेविका शुभांगी सुनील डोंगरे यांनी निवेदन देऊन केली आहे.
. पालकमंत्री डॉ पंकज भोयर दि 12 जुलैला 2026 ला हिंगणघाटच्या दौऱ्यावर आले असतांना नप मध्ये सौं शुभांगी डोंगरे यांनी हॆ निवेदन सादर केले. या निवेदनातून त्यांनी शहरातील विविध समस्याची दखल पालक मंत्री म्हणून घेण्याची विनंती केली आहे. येथील शाळा, महाविद्यालये परिसरात मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक स्थापन करून पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, शहरातील बाजारपेठ, मुख्य मार्ग, बस स्थानक आदी ठिकाणी स्वच्छ प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. हिंगणघाट नप अंतर्गत येणाऱ्या दलीत वस्ती हा दलीत वस्तीत खर्च नं करता अन्यत्र खर्च झाला या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
. सदर निवेदन डॉ पंकज भोयर वर्धा जिला पालक मंत्री यांना नि देतांना आ.समीर कुणावार, एड सुधीर कोठारी, नप अध्यक्षा नयना तुळसकर, नगरसेविका शीतल बोरकर, व मनीषा लोणकर उपस्थित होते.

