कुरणखेड येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था; ‘नेते’ नेमके कधी जागे होणार? नागरिकांचा संतप्त सवाल*

*कुरणखेड येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था; ‘नेते’ नेमके कधी जागे होणार? नागरिकांचा संतप्त सवाल*

( मुख्य अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान )

 कुरणखेड (काटेपूर्णा):अकोला जिल्ह्यातील कुरणखेड (काटेपूर्णा) गावात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था ग्रामस्थांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. गावात येण्यासाठी दोन प्रमुख रस्ते आहेत. त्यापैकी मुख्य बाजारपेठेतील शुभम हार्डवेअरसमोरील रस्त्याची स्थिती चांगली असून, तिथे वाहतुकीस कोणतीही अडचण नाही. मात्र, मुख्य बसस्थानकापासून ते थेट रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या दुसऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आणि दळभद्र झाली आहे.शाळकरी मुले व वृद्धांचे हाल; अपघाताची भीतीयाच मुख्य रस्त्यावर वॉर्ड क्रमांक १, कुरेशी मोहल्ला, खतीब पुरा, जिल्हा परिषद शाळा, को-ऑपरेटिव्ह बँक, हायस्कूल आणि स्वतः कुरणखेड ग्रामपंचायत कार्यालय आहे. बाहेरून बसने किंवा इतर वाहनाने येणारे बहुतांश नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, सध्या या रस्त्यावर तब्बल २ ते ३ फुटांपर्यंत चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही अशक्य झाले आहे. रोज शाळेत जाणारी लहान मुले, वृद्ध आणि महिलांना या चिखलातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक लहान मुले चिखलात घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून, येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.रस्ते दुरुस्तीत दुजाभाव का? ग्रामस्थांचा आरोपपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील इतर भागांत मुरुम टाकण्यात आला, परंतु सर्वाधिक रहदारी असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्याबाबत असा दुजाभाव का केला जात आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.तातडीने मुरुम टाकण्याची मागणी"एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच गावातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जागे होणार का? अपघाताची जबाबदारी कोण घेणार?" असा सवाल करत संतप्त ग्रामस्थांनी स्थानिक नेते आणि संबंधित प्रशासनाकडे या रस्त्यावर तातडीने मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित रस्ता न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
Previous Post Next Post