जाम बस स्थानक पाण्याच्या खड्ड्यात...
बस प्रवाशांचे,बस चालकांचे हाल...
खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा ....l
(राजू कांबळे
मिडिया पोलीस टाईम
वर्धा नागपूर अमरावती विभागीय संपादक )
खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा ....l
जाम : समुद्रपूर तालुक्यातील जाम बस स्थानक नागपूर, चंद्रपूर, हिंगणघाट या मोठ्या हायवे रोड वर असून सर्व लांब पल्याच्या बसेस जाम बस स्थानकावर येतात आणि तशी तिथे प्रवाशांची, शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वरदळ असते. प्रवाशांनाच्या सोबत असलेल्या छोट्या मुलांना, त्यांच्या लगेज सोबत बस स्थानकात एंट्रीच करणे शकत नाही.
बस चालकाना बस स्थानक च्या प्रवेश द्वारातून, बस आत मध्ये आणि बहार घेताना आणि रात्रीला तर अतिशय त्रास सहन करून बस चालवावी लागत आहे.
हिंगणघाट बस आगाराने या बाबी कडे लक्ष देऊन बस प्रवाशांना व विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासा पासून मुक्त करावे अशी प्रवाशांची आणि जाम नागरिकांची मागणी होत आहे.

